वनामकृवितील अश्वमेध मैदानाजवळील घटना
परभणी (Parbhani Crime) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अश्वमेध मैदानाकडे पती – पत्नी मॉर्निंग वॉकला गेले होते. पती लघुशंकेस गेल्यानंतर दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखींनी महिलेच्या गळ्यातील २ लाख ३५ हजार ८९८ रुपये किंमतीचे चार तोळ्याचे सोन्याचे गंठण लंपास केले. ह घटना मंगळवार २० ऑगस्ट रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडली. या (Parbhani Crime) प्रकरणी अनोळखी चोरट्यावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन अनोळखींवर गुन्हा दाखल
निर्मला अंदोले यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी या पती प्रविण अंदोले यांच्यासोबत मॉर्निंग वॉकसाठी वनामकृवितील अश्वमेध मैदानाकडे गेल्या होत्या. मॉर्निंग वॉक करुन पायी घराकडे येत असताना त्यांच्या पतीला लघुशंका आल्याने ते नाल्याच्या कडेला गेले. तर फिर्यादी एकट्या पायी हळूहळू चालत होत्या. याच वेळी समोरुन दुचाकीवर दोघेजण आले. त्यांनी बळजबरीने फिर्यादीच्या गळ्यातील गंठण हिसकावले. चोरटे दुचाकीवर बसून पसार झाले. घडला प्रकार महिलेने पतीला सांगितला. त्यानंतर नवा मोंढा पोलीस ठाणे गाठत अनोळखी चोरट्यांविरुध्द तक्रार (Parbhani Crime) देण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.