परभणी शहरातील मातोश्री विहार नगरातील घटना
परभणी (Parbhani Crime) : बांधकाम सुरू असलेले घर फोडत चोरट्यांनी सोन्या – चांदीचे दागिने व रोकड लंपास केली. ही घटना २८ जुलैच्या सकाळी अकरा ते ९ ऑगस्टच्या सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान परभणी शहरातील मातोश्री विहार नगर भागात घडली. या प्रकरणी अनोळखी चोरट्यावर (Parbhani police) नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवा मोंढा पोलिसात नोंद
सुनील भगवान कांबळे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे आंध्रप्रदेश मध्ये एका बँकेत विधी अधिकारी म्हणून कर्तव्यावर आहेत. त्यांचे परभणी शहरातील मातोश्री विहार नगर भागात घर आहे. या घरात सध्या बांधकाम सुरू आहे. (Parbhani Crime) फिर्यादी हे आपल्या परिवारासह नौकरीच्या ठिकाणी होते. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने ते परभणीला घरी येतात. १० ऑगस्टला पहाटेच्या सुमारास ते घरी आले असता त्यांना घराच्या दाराचा कडीकोंडा तुटलेला दिसला. तसेच सीसीटिव्ही कॅमेरा देखील फोडण्यात आला होता. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घराची पाहणी केली असता त्यांना सोन्या – चांदीचे दागिने आणि रोकड लंपास झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी (Parbhani police) नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.