परभणीतील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Crime) : पत्नीला त्रास देऊन तिचा छळ करत घराबाहेर हकलून देणार्या पोलीस पतीसह सासरच्या मंडळीवर विवाहितेच्या तक्रारीवरुन ८ ऑगस्ट रोजी (Parbhani Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Police) पोलीस या बाबत अधिक तपास करत आहेत. सुनीता गजभारे या विवाहितेने तक्रार दिली आहे. त्यांचे लग्न सन १९९९ मध्ये संजय गजभारे याच्या सोबत झाले होते. लग्नानंतर दिड वर्ष चांगले नांदविल्यावर सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात झाली. सासर्याने दुचाकी घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणत त्रास दिला. तसेच पतीने मद्यपी अवस्थेत विवाहितेला मारहाण करत शिवीगाळ केली.
आज ना उद्या त्रास कमी होईल. या अपेक्षेत विवाहिता होती. मात्र त्रास वाढत गेला. बाहेरख्याली असलेल्या पोलीस पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या विवाहितेने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता पतीने शिवीगाळ करत मारहाण (Parbhani Crime) करुन दोन्ही मुलांसह पत्नीला घराबाहेर हकलून दिले. पुन्हा घरात आलात तर तुम्हाला खतम करुन टाकतो, अशी धमकी दिली. कोणाकडे तक्रार करायची कर, मी स्वत: एक पोलीस आहे, असे म्हणत घराबाहेर हकलून दिले. त्रासाला कंटाळलेल्या विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन संजय गजभारे, पांडुरंग गजभारे, गंगाधर गजभारे, शोभाबाई गजभारे, राहूल गजभारे यांच्यावर कोतवाली पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. (Parbhani Police) पोलीस अधिक तपास करत आहेत.