परभणी (Parbhani Crime) : कर्जाचे पैस फेडण्यावरुन झालेल्या वादात सासरच्या मंडळींनी ३६ वर्षीय विवाहितेला (Parbhani Crime) विषारी द्रव पाजून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना १६ जून रोजी दुपारी दोन वाजता सेलू शहरातील राजीव गांधी नगरात घडली. उपचारा दरम्यान विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन सासरच्या मंडळीवर २० जून रोजी सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीच्या सेलू शहरातील राजीव गांधी नगरामधील घटना
द्रोपताबाई पवार यांनी तक्रार दिली आहे. १६ जुनला सकाळी आठ वाजता घरच्या मंडळींनी कोण किती कर्ज फेडायचे या विषयी चर्चा केली होती. त्यानंतर फिर्यादीचे मामासासरे गोरख काळे आले. त्यांचे आणि फिर्यादीच्या सासरच्या मंडळीमध्ये बोलणे झाले. त्यानंतर संबंधितांनी फिर्यादी सोबत वाद घालत तिला बळजबरीने उंदीर मारण्याचे (Parbhani Crime) विषारी द्रव पाजले. फिर्यादीला घराच्या पाठीमागील शेतात नेऊन टाकले. घडला प्रकार फिर्यादीने पतीला सांगितला. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी शंकर पवार, जमनाबाई पवार, गोरख काळे, ज्ञानेश्वर पवार यांच्यावर (Selu police) सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani police) पोलीस अधिक तपास करत आहेत.