परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरात पोलिसांनी मारला छापा
परभणी (Parbhani Crime) : स्थानिक गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकाने खंडोबा बाजार परिसरात एका लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला साडेचार किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवार२० जून रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आली. सदर प्रकरणी दोन जणांवर (Parbhani Police) नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड यांच्या नेतृत्वात पथक अवैध धंद्यांची माहिती काढत गस्त घालत होते.
दोघांवर नानलपेठ पोलिसात गुन्हा
या पथकाला खंडोबा बाजार परिसरात लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली. पथकाने सदर ठिकाणी छापा मारला. या (Parbhani Crime) कारवाईत ४४ हजार ४५० रुपये किंमतीचा ४ किलो ४५० ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी फिरोज कुरेशी उर्फ बाली मोहम्मद कुरेशी, शेख सिकंदर शेख मोहसीन या दोघांवर (Parbhani Police) नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोनि. चितांबर कामठेवाड करत आहेत.