चुडावा पोलीस ठाणे हद्दितील घटना
परभणी (Parbhani Crime) : जीवे मारण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना चुडावा पोलीस ठाणे )Chudava Police_ हद्दित घडली. या प्रकरणी आरोपीवर २७ जुलै रोजी चुडावा पोलिसात अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ वर्षीय पिडित मुलीने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, आरोपी आकाश सदावर्ते याने २९ एप्रिल २०२३ ते ११ जून २०२४ या दरम्यान पिडितेला तु मला फोनवर बोल नाहीतर तुझ्या आई – वडिलांना व भावाला जीवे मारतो, अशी धमकी दिली.
आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
पिडिता घरी एकटी असताना तु मला खुप आवडतेस, असे म्हणत तिच्या सोबत बळजबरी केली. या (Chudava Crime) नंतर पिडितेच्या इच्छेविरुध्द वारंवार शरीर संबंध स्थापन केले. या दरम्यान आरोपीने पिडितेला कोणत्यातरी गोळ्या खाऊ घातल्याने पिडितेची प्रकृती खालावली. अखेर पिडितेने आई – वडिलांना सोबत घेऊन (Chudava Police) चुडावा पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. तपास पोउपनि. अरुण मुखेडकर करत आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, सपोनि. एन.जी. ओमनाळकर, पोलीस अंमलदार गवळी, काकडे, इंगळे, मिटके, गायकवाड, राठोड आदींनी भेट दिली.