परभणी(Parbhani) :- पुर्णा तालुक्यातील आडगाव लासीना मार्गावर एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करत तु मला खुप आवडतेस, मला तुझ्या सोबत लग्न (marriage) करायचे आहे म्हणत गैरवर्तन करत विनयभंग(molestation) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पुर्णा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुर्णा तालुक्यातील आडगाव लासीना मार्गावरील घटना
या घटने बाबत अधिक माहिती अशी की, आरोपी वसंत जाधव रा.आडगाव यांने सोमवार १ जुलै ते शुक्रवार ५ जुलै दरम्यान आडगाव लासीना मार्गावर फिर्यादीचा सतत पाठलाग करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी पिडीत तरुणीस तु मला खुप आवडतेस, मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे असे म्हणत गैरवर्तन करत विनयभंग केला. तसेच तु मला बोलली नाहीस तर मि स्वत:च्या जीवाचे बरे वाईट करेल अशी पिडीतेस धमकी (threat) दिली. या प्रकरणी सपोनि आर.एस.शहारे यांनी शुक्रवार ५ जुलै रोजी भारतीय न्याय संहिते नुसार गुन्हा दाखल करुन घेतला असून पुढील तपास सपोनि डि.एस.शिंदे करत आहेत.