परभणी (Parbhani):- कंपनीच्या ग्राहकांकडून रक्कमेची वसुली करत सदर रक्कम कंपनीला न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापर करुन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एकावर ९ जानेवारी रोजी मानवत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६ लाख ७७ हजार २०७ रुपयांची कंपनीला न भरता स्वत:च्या फायद्यासाठी केला वापर
महेश माने यांनी तक्रार दिली आहे. रेडीयंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीत असलेल्या विष्णू मुंजाभाऊ चौरे याने सदर फसवणूक केली. ९ ऑक्टोबर २०२४ ते १४ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान फसवणुकीचा प्रकार घडला. विष्णू चौरे याने कंपनीच्या ग्राहकाकडून पैसे वसूल केले. सदर ६ लाख ७७ हजार २०७ रुपयांची कंपनीला न भरता स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर केला. कंपनीचा विश्वासघात केला. आर्थिक अफरातफर करत फसवणूक केल्या प्रकरणी संबंधित विष्णू चौरे याच्यावर ९ जानेवारीला मानवत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. पतंगे करत आहेत.