परभणी शहरातील घटना
परभणी (Parbhani Crime) : उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आत्याकडे आलेल्या नऊ वर्षीय मुलीवर आत्याच्या चुलत सासर्याने अत्याचार केला. ही घटना रविवार २६ मे रोजी परभणी शहरातील (Parbhani Police) नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली. सदर प्रकरणी आरोपी साठ वर्षीय इसमावर (Parbhani Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आत्याने या बाबत नानलपेठ पोलीसात (Parbhani Police) तक्रार दिली आहे. शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने फिर्यादीची भाची तिच्याकडे राहण्यासाठी आली होती. फिर्यादीच्या घराजवळ आरोपी चुलत सासर्याचे घर देखील आहे.
आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
अधुन मधून मुलगी आरोपीच्या घरी खेळण्यासाठी जात होती. २६ मे रोजी सकाळच्या सुमारास (girl molested) पीडित मुलीने फिर्यादीला पोटात दुखत असल्याचे सांगितले. विश्वासात घेऊन विचारणा केली असता पीडितेने घडला प्रकार सांगितला. आठ दिवसापुर्वी आरोपीने दुचाकीवर बसवून पीडितेला सोबत नेले होते. एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा चार दिवसांनी आरोपीने आपल्या राहत्या घरी पीडितेला घेऊन जात पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. घडला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. (Parbhani Crime) घटनेची माहिती पुढे आल्यानंतर फिर्यादीने या बाबत पीडितेचे आई – वडील व नातेवाईकांना कळविले. त्यानंतर (Parbhani Police) नानलपेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. फिर्यादीच्या साठ वर्षीय चुलत सासर्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Police) पोलीस अधिक तपास करत आहेत.