मोबाईलवर फोन करून घेतली बँक खात्याची माहिती
परभणी (Parbhani Crime) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांची १० लाख ९९ हजार रूपयाची फसवणूक करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने प्रâॉड लिंक पाठवून बँक खात्याची माहिती घेत कुलगुरूंची फसवणूक केली. या (Online Froud) प्रकरणी अज्ञात मोबाईल वापरकर्त्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल (Parbhani Crime) करण्यात आला आहे.
फसवणूकीचा गुन्हा दाखल
याबाबत कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी तक्रार दिली आहे. ५ जुलै रोजी कार्यालयात कामकाज करत असतांना त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. संबंधिताने कुलगुरूंना तुम्हाला एक संदेश पाठवला असून त्यावरील लिंकमध्ये जाऊन माहिती भरण्याचे सांगीतले. संबंधिताने बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून केवायसी अपडेट करायचे आहे असे सांगत बँक खात्याची माहिती घेतली. तुमची ट्रान्झेक्शन लिमिट वाढवत आहे, असे म्हणत बोलण्यात गुंतवून ठेवले. कुलगुरूंनी सर्व माहिती दिली. या दरम्यान बँकेच्या दिल्ली कार्यालयातून फोन आला. १० लाखाचे ट्रान्झेक्शन झाले आहे असे सांगीतले. त्यानंतर कुलगुरूंना आपली (Online Froud )फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दोन वेगवेगळ्या बँक खात्यातून १० लाख ९९ हजार रूपयांचा ऑनलाईन बँक फ्रॉड करण्यात आला. या प्रकरणी नवामोंढा पोलीसात गुन्हा (Parbhani Crime) नोंद झाला असून तपास पो.नि.समाधान चवरे करत आहेत.