परभणी (Parbhani Crime) : शहरातील कृषी नगर भागात घरात घुसून महिलेचा विनयभंग (Parbhani Crime) करण्यात आल्याची घटना रविवार ९ जून रोजी घडली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील सर्व आरोपींना (Parbhani police) पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
परभणी शहरातील कृषी नगर भागातील घटना
माहितीनुसार, फिर्यादीच्या राहत्या घरी येऊन हात धरत “तु माझ्या सोबत चल” असे म्हणत हाताला धरुन ओढले. त्यानंतर घाबरलेल्या फिर्यादीने आरडाओरड केली असता फिर्यादीचा दिर तेथे येऊन सोडवण्याचा प्रयत्न केला. अचानक इतर आरोपीही तेथे आले. त्यांच्या हातात काठ्या होत्या. फिर्यादीच्या दिराला वीटाने व काठ्यांनी मारहाण केली. फिर्यादीची सासु यांना देखील शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. (Parbhani Crime) तसेच घराच्या बाजुला असलेल्या पत्राच्या कंम्पाउंडची तोडफोड केली आणि फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण बळजबरीने घेवून गेले.
कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आरडा ओरडा झाल्याने सर्व आरोपी दुचाकीवरुन पळून गेले. फिर्यादीच्या दिराला गंभीर दुखापत झाल्याने (Parbhani police) कोतवाली पोलीस ठाणे गाठत फिर्यादीने गुलाब खान, रफिक खान, पाशा, हुसैन, अजीम खान, शेख लाला, अकरम अशा एकूण सात आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोउपनि. पोपलवार करत आहेत. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे, स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड व (Parbhani police) कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि. ननवरे यांनी भेट दिली.