परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कामगिरी
नानलपेठ, कोतवाली पोलिसांकडे आरोपी स्वाधीन
परभणी (Parbhani Crime) : विविध गंभीर गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना जेरबंद करण्यात (Parbhani Crime) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी कोतवाली, नानलपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी (Parbhani Crime) दिलेली माहिती अशी की, कोतवाली पोलिस ठाण्यात सुनिल लक्ष्मण शिराळे वय ३५ वर्ष, ह.मु.कृषी नगर याच्या विरुध्द सात वर्षापूर्वी कलम ३७९,३२३, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद होता. तेव्हापासून सुनिल शिराळे हा फरार होता. मात्र सुनिल शिराळे हा त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती स्थागुशा पथकाला गुप्त बातमीदारांकडून मिळाली. त्यानुसार रविवार १ डिसेंबर रोजी सापळा रचून स्थागुशा पथकाने मोठ्या शिताफीने सुनिल शिराळे यास ताब्यात घेतले. त्याला घेऊन कोतवाली पोलिस ठाण्याकडे येत असतानाच नानलपेठ पोलिसांना पाहिजे असलेला फरार आरोपी राहूल उर्फ बाप्या शेषराव खरात रा. विकास नगर हा राहत्या घरी असल्याची माहिती पथकाला मिळाली.
तात्काळ पोलिसांनी (Parbhani Crime) छापा मारुन राहूल उर्फ बाप्या खरात यास ताब्यात घेतले. सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना संबंधित पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी, अपर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या आदेशावरुन स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. आर.एस. मुत्येपोड, पोउपनि. गोपिनाथ वाघमारे, सपोउपनि. मधूकर चट्टे, पोह. आर.बी. जाधव, पोना. विष्णु चव्हाण, मधूकर ढवळे, परसोडे, शेख रफियोद्दीन, चालक संजय घुगे, हनवते, सायबर सेलचे गणेश कौटकर यांच्या पथकाने पार पडली.