परभणीच्या पाथरी ते आष्टी रोडवरील घटना
परभणी (Parbhani Crime) : बचतगटाचे कलेक्शन करुन दुचाकीने परत येत असलेल्या एका कर्मचार्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालुन त्याच्या जवळील २ लाख ५१ हजार ६८० रुपयांची रोकड आणि एक मोबाईल मिळून २ लाख ८० हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास पाथरी ते आष्टी रोडवर वडीफाट्या जवळ घडली. या प्रकरणी २६ ऑक्टोबरला दोन अनोळखींवर (Parbhani Crime) पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन अनोळखींवर परभणीतील पाथरी पोलिसात गुन्हा
विजय काटकर यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे संघ मॅनेजर म्हणुन काम करतात. बचतगटाकडून कलेक्शन केलेली रक्कम घेऊन फिर्यादी दुचाकीने जात असताना पाठीमागुन दुसर्या एका दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीला लोखंडी रॉडने डोक्यात मारुन जखमी केले. फिर्यादी जवळील रोकड आणि मोबाईल हिसकावुन घेत पळ काढला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लुटमार करणार्या दोन अनोळखी इसमांवर (Parbhani Crime) पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.