शहराच्या साकलाबाद प्लॉट प्रभागातील स्थानिक रहिवाशांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
परभणी (Parbhani Crime) : शहरातील साखला प्लॉट परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अवैध दारुविक्री केली जात आहे. त्यामुळे परिसरात गुन्हेगारी वाढत असून सामाजिक स्वास्थ धोक्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालून अवैध दारु विक्री बंद करावी, अशी मागणी माजी मनपा सदस्य फारुक बाबा यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले की, शैलेंद्र गौडा नामक व्यक्ती ताडी, सिंधी सारख्या अवैध दारुची विक्री करत असल्याने परिसरात गुन्हेगारी वाढत आहे. या प्रकाराला आळा घालण्याची मागणी फारुक बाबा, फेरोज बाबा, शेख शकील, अमजद पठाण, बाबु पटेल आदीनी केली आहे.