परभणी (Parbhani) :- सांगली जिल्ह्यातील करजगी व नाशिक जिल्ह्यातील टाकेत गावातील अल्पवयीन मुलींवर घडलेल्या अत्याचारांचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात (Fast Track Courts) चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मुश्शु खान फाउंडेशनच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे करण्यात आली आहे.
या घटनांमुळे महाराष्ट्र हादरले आहे. तपासाची गती संथ न होऊ देता फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर मुसद्दीक खान, सय्यद अकबर अली, हबीब खान यांच्या स्वाक्षर्या आहेत.