परभणी/सेलू(Parbhani):- तालुक्यातील डासाळा येथील जिल्हा परिषद (Zilla Parishad) केंद्रीय प्राथमिक शाळेच्या ब्लूटूथ, साउंड बॉक्स सह ७ हजार ३०० रुपयांच्या मुद्देमालाची चोरी २० ऑगस्ट रोजी झाली असून हा प्रकार २१आगस्ट रोजी उघडकीस आला. पोलीसांनी केलेल्या तपासात एका तरुणास ताब्यात घेतले असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शाळेत चोरी सात हजार रुपयांचे साहित्य लंपास
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील डासाळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या रूम नंबर चार आणि वर्ग चौथी मधील भिंतीवर चढून लोखंडी पत्राचे नटबोल्ट काढून पत्रा सरकवून आरोपींनेआत मध्ये प्रवेश केला. कुलूप नसलेल्या कपाटात ठेवलेले एसीईआर टेंब, ब्लूटूथ असा एकूण ७ हजार ३०० रुपयाचा मुद्देमालाची चोरी करण्यात आली. २१ ऑगस्ट रोजी घटना उघडकीस आल्यानंतर पोलीसात २२ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी घटनास्थळ आणि शाळेतील सीसीटीव्हीचे फुटेजची (CCTV footage) पाहणी केल्यानंतर निवृत्ती बंशी जाधव राहणार डासाळा यास ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली देऊन मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे. शाळेचे मुख्याध्यापक मधुकर काष्टे हल्ली मुक्काम श्रीराम कॉलनी सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार संहिते अन्वये निवृत्ती बंशी जाधव राहणार डासाळा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत.