परभणी/जितुर (Parbhani Crime) : शहरातील जालना रस्त्यावरील एका एटीएम केंद्रासमोर माजी नगरसेवक व गल्लीतीलच तरुणांत वाद होऊन त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यात माजी नगरसेवक संजय निकाळजे, लखन लक्ष्मण कुऱ्हे, आकाश लक्ष्मण कुऱ्हे हे तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री साडेनऊ वाजता घडली. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात (Parbhani Hospital) आणले असता, तिथे उपस्थित वैधकीय अधिकाऱ्यांना प्राथमिक उपचार करू न देता समर्थकांनी मारामारी सुरू केल्याने एकच गोधळ उडाला होता.
घटनेतील तिघा जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात (Parbhani Hospital) पाठविण्यात आले. या बाबत मंगळवार दि. 14 मे रोजी गुन्हा दाखल झाला नव्हता. माहितीनुसार, शहरातील माजी नगरसेवक संजय निकाळजे हे जालना रस्त्यावरील एटीएम केंद्राजवळ उभे असतांना त्यांच्या वॉर्डातीलच आकाश कुऱ्हे, लखन कुऱ्हे याच्या सोबत जुन्या भाडणावरून शाब्दिक चकमक उडाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. कुऱ्हे बंधूनी संजय निकाळजे याच्या डोक्यावर मारल्याने रक्तस्राव होऊन ते गंभीर जखमी झाले. संजय निकाळजे यांनीही आकाश कुऱ्हे व लखन कुऱ्हे याच्यावरही वार केल्याने हे दोघे भाऊ ही गंभीर जखमी झाले.
या तिघांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात (Parbhani Hospita)l आणले असता, मोठ्या संख्येने जमलेल्या त्यांच्या समर्थकांनी हाणामारी सुरू केल्याने या तिघांवरही उपस्थित वैधकीय अधिकाऱ्यांना प्राथमिक उपचार करता आले नाही. घटनेची माहिती मिळताच (Parbhani Police) पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे, सहाय्य पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे, लीला जोगदंड यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन दोन्ही बाजूच्या समर्थकांना बाहेर काढले व परिस्थिती आटोक्यात आणली. आज सायंकाळी उशिरापर्यन्त जखमींची जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या मारामारीचे निश्चित कारण समजु शकले नाही.