परभणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; मुद्देमालासह चार आरोपी ताब्यात
परभणी (Parbhani Crime) : टिप्पर चोरणार्या टोळीला एका टिप्परसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ४ आरोपींना ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी चुडावा (Parbhani police) पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ऑक्टोबर महिन्यात धनगर टाकळी येथून शरद किशनराव जोगदंड यांचा टिप्पर चोरीला गेला होता. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड यांच्या पथकाने तपास केला. शेख सलीम, बापुराव डुकरे, निखिल ढगे यांनी टिप्पर चोरी केल्याचे पुढे आले. तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी शेख जमील, शेख गुलाब याला वाहन विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी सदर वाहन जप्त केले असून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी चुडवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
गोपनिय माहितीच्या आधारे कारवाई
चुडावा पोलीस ठाणे हद्दीतील धनगर टाकळी येथून टिप्पर चोरीला गेल्याची माहिती मिळाल्यावर गोपनिय माहितीच्या आधारे चोरीचा शोध लावण्यात आला. पोनि. अशोक घोरबांड, सपोनि. पांडुरंग भारती, पोउपनि चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, राहुल परसोडे, लक्ष्मण कागणे, हनुमान ढगे, दिलीप निलपत्रेवार, परसराम गायकवाड, उत्तम हनवते, मोहम्मद शारेख, गणेश कौटकर यांच्या पथकाने कारवाई केली.