परभणी शहरातील वसमत रोडवरील घटना
परभणी (Parbhani Crime) : ट्रक चालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याच्याजवळील रोकड लुटण्यात आल्याची घटना (Parbhani Crime) मंगळवार २५ जून रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास परभणी शहरातील वसमत रोडवर घडली. या प्रकरणी एकूण सहा जणांवर नवा मोंढा पोलिसात (Mondha police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आरोपींना (Parbhani Police) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवा मोंढा पोलिसात गुन्हा
राजेश मस्के या वाहन चालकाने तक्रार दिली आहे. फिर्यादी हे वाहन घेवून परभणी मार्गे अमरावतीकडे जात होते. २५ जून रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास वसमत रोडवर दोन दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी फिर्यादीचे वाहन आडविले. गळ्याला चाकू लावत फिर्यादी जवळील सहा हजार एकशे रुपये काढून घेतले. घडला प्रकार फिर्यादीने डायल ११२ वर फोन करुन सांगितला. तात्काळ (Parbhani Police) पोलीस दाखल झाले. लुटमार करणार्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी शुभम सुर्यवंशी, नारायण रायमले, हर्षद ताल्डे, अर्जून डिघोळे, वैभव रायमले, देवा लोणे यांच्यावर (Mondha police) नवा मोंढा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.