परभणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
परभणी (Parbhani Crime) : राज्यभरात मोटारसायकल चोरी करणार्या चोरट्यास स्थानिक (Crime Branch) गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. चोरट्या जवळून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरलेल्या मोटारसायकलची विल्हेवाट लावणार्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहे. (Parbhani Police) पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी शहरात होणार्या मोटारसायकल चोरीचा आढावा घेवून गुन्हे उघड करण्याविषयी आदेश दिले होते. स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड यांनी पथक तयार केले.
वीस मोटारसायकल हस्तगत
पोउपनि. अजित बिरादार, (Parbhani Police) पोलीस अंमलदार बाळासाहेब तुपसुंदरे, रवि जाधव, शेख रफिक, निलेश परसोडे, हुसैन पठाण, गणेश कौटकर, बालाजी रेड्डी, गौस पठाण यांच्या पथकाने तांत्रिक माहितीचे विश्लेषण करत, अखिल महेबुब शेख याने सदर गुन्हे केल्याचे निष्पन्न केले. त्याच्या विरुध्द पुरावे गोळा करत संबंधित आरोपीलाताब्यात घेण्यात आले आहे. चार पथके तयार करुन आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे बीड, लातूर, सोलापूर, परळी, मरुड, बार्शी आदी ठिकाणाहून २० मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. यामध्ये परभणी जिल्ह्यातील ६, सोलापूर २, लातूर २ असे एकूण १० गुन्हे (Crime Branch) उघडकीस आले आहेत.