शहरातील जनप्रिय कॉलनीत घरफोडी
परभणी(parbhani):- पाहुण्यांकडे लग्नासाठी(married) गेलेल्या शिक्षकाचे घर फोडत चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून ९४ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवार ६ मे रोजी दुपारी ४ च्या सुमारास उघडकीस आली.
उघडा महादेव मंदिर परिसरातील जनप्रिय कॉलनीत चोरी
सतीष एकनाथराव कांबळे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे पत्नीसोबत लग्न कार्यासाठी ५ मे रोजी सकाळी ९.३० वाजता नांदेड जिल्ह्यात गेले होते. ६ मे रोजी दुपारी ४ च्या सुमारास ते परत घरी आल्यावर त्यांना घराला लावलेले कुलूप दिसले नाही. आत जावून पाहणी केल्यावर घरातील साहित्य अस्ताव्यस्त (Awkward material) पडल्याचे दिसून आले. कपाटामध्ये ठेवलेले ८४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने (Gold ornaments)आणि रोख १० हजार रुपये मिळून ९४ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान मागील काही दिवसात चोरीच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने नागरीक बाहेर गावी जात आहेत. याचा फायदा घेत चोरटे घरातील मौल्यवान वस्तू (valuables)व इतर साहित्य चोरून नेत असल्याचे दिसत आहे.