मुलीच्या घरात घुसून धमकी देणार्या युवकावर गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Crime) : मी तुमच्या मुलीसोबत लग्न करणार आहे, तुम्ही लग्न करण्यासाठी तयार राहा नाहीतर बंदुकीने गोळ्या घालीन, अशी धमकी देणार्या युवकावर नानलपेठ पोलीस (Nanalpet Police) ठाण्यात ७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल (Parbhani Crime) करण्यात आला आहे. याबाबत पिडित २२ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. सदर तरुणीची दत्तधाम परिसरातील युवका सोबत एका लग्नामध्ये ओळख झाली होती. तरुणाने तरुणीला लग्ना विषयी विचारल्यावर तिने नकार दिला. या नंतर सदर तरुणाने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणीचा पाठलाग केला.
या दरम्यान ६ ऑगस्ट रोजी तरुणाने तरुणीच्या घरी येऊन तिच्या आई- वडिलांना तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून नाही दिले तर तुमच्या पूर्ण परिवाराला बंदुकीच्या गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वी १ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास सदर तरुणाने तरुणीच्या घरात घुसून असभ्य वर्तन करत धमकी दिली होती. तरुणाच्या या त्रासाला कंटाळून पिडित तरुणीने नानलपेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. तिच्या या तक्रारीवरुन रोहित मोरे नावाच्या तरुणावर (Nanleth Police) नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Parbhani Crime) करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.