वझुर येथील घटना!
परभणी (Parbhani Crime) : परभणीच्या गंगाखेड येथे पतीसोबत वाद झाल्याने वझुर ता. पूर्णा येथील 23 वर्षीय विवाहितेने घर सोडल्याची घटना 1 जून रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. पतीने दिलेल्या खबरीवरून याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद (Report Lost) करण्यात आली आहे.
गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून विवाहिता हरवल्याची नोंद घेण्यात आली!
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड पोलीस ठाण्याच्या (Gangakhed Police Station) हद्दीत असलेल्या पूर्णा तालुक्यातील वझुर येथील ज्ञानदेव गणेशराव आव्हाड व त्यांची पत्नी कविता ज्ञानदेव आव्हाड यांच्यात घरगुती कारणावरून भांडण झाल्यामुळे या भांडणाचा राग (Fight Anger) मनात धरून कविता ज्ञानदेव आव्हाड वय 23 वर्ष या विवाहितेने दि. 31 मे रोजीचे रात्री 10:30 ते 1 जून रोजीचे सकाळी 7 वाजेदरम्यान घरात कोणाला काहीही न सांगता, घर सोडले (Left Home) बराच वेळ झाला तरी ती घरी परत आली नसल्याने वझुर गावात तसेच गंगाखेड येथे नातेवाईकांकडे तिचा शोध घेऊन ही मिळून न आल्याने दि. 2 जून रोजी विवाहितेचे पती ज्ञानदेव आव्हाड रा. वझुर ता. पूर्णा यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून विवाहिता (Married) हरवल्याची नोंद घेण्यात आली. लांबट चेहरा, गोरा रंग, पाच फूट उंची असलेली व सडपातळ बांध्याची महिला कोणाला आढळून आल्यास गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, तपासिक अंमलदार मुंजा वाघमारे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे (Press Release) करण्यात आले आहे.




