शहरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ उपोषण मैदानात
Parbhani:- उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना परभणी जिल्ह्याच्या वतीने आज रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. आज करण्यात आलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra) ग्रामीण जीवनज्योती अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थपणेला मान्यता देवून सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी(Contracting Officer), कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या प्रमुख मागणी साठी आजचे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उमेद महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व महिला पुरुष अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.