परभणीतील सेलू पोलिसात सहा जणावर गुन्हा दाखल
पाच आरोपी ताब्यात, घटनास्थळी हजारो बघ्यांनी केली गर्दी
पाच आरोपी ताब्यात, घटनास्थळी हजारो बघ्यांनी केली गर्दी
परभणी/सेलू (Parbhani Dead Body) : शहरातील डिग्रसवाडी शिवारात हरिचंद्र राठोड यांच्या पाणी असलेल्या खदानित आरोपीतांनी अडीच महिन्यापूर्वी अत्यंत सुनियोजित पद्धतीने टाकलेला २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह पोलीसांनी मंगळवार १४ जानेवारी रोजी दुपारी एक वाजल्यापासून प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास खदानीच्या पाण्यातून मृतदेह (Dead Body) बाहेर काढला आहे. याप्रकरणी सहा आरोपी पैकी पोलीसांनी आतापर्यंत पाच आरोपींना ताब्यात घेतले असून तपासानंतर पुन्हा आरोपी वाढण्याची शक्यता या घटनेचा तपास करणारे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली आहे.
याबाबतची माहिती याप्रमाणे शहरातील वालूर नाका परिसरातील रहिवाशी संतोष प्रकाश पवार वय २३ वर्ष याचा (Dead Body) मृतदेह दिग्रसवाडी शिवारातील हरिचंद्र राठोड यांच्या खदानीत आरोपीतांनी टाकल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थाच्या सहकार्याने तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह खदानीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला. आरोपीतांनी झाडे लावण्याच्या लोखंडी जाळीत मृतदेह पॅक करून रस्त्यावर दिशा दाखवणारे दगड डोके, पाय आणि पोटावर बांधल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी निर्माण झाल्या. घटनास्थळीच वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय लोया यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
अशी घडली घटना
शहरातील नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड परिसरात प्रकाश नावाडे यांचे शेत आहे. हे शेत नावाडे यांनी ठोक्याने वहितीसाठी बबन गोरे यांना दिलेले आहे. या शेतात पिकाचे वन्य प्राण्यापासून नुकसान होऊ नये म्हणून धु-याच्या बाजूने लोखंडी तार लावून त्यात करंट सोडले होते. या (Dead Body) प्रकाराने जीवितहानी होते. याची कल्पना असताना हे कृत्य केले आहे. आरोपी पैकी अर्जुन गंगाराम काळे वय ३० वर्षे, चंदर कठाळू चव्हाण वय २७ वर्षे यांना मयत संतोष प्रकाश पवार हा शॉट लागून मरण पावल्याचे माहित असताना समाजाच्या भीतीपोटी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन मोटरसायकलच्या साह्याने प्रेत हरिचंद्र राठोड यांच्या पाण्याच्या खदानित व्यक्तीस३१ ऑक्टोबर २०२४ रात्री १० ते १ नोव्हेंबर २०२४ ५ वाजता खदानीत टाकला.
मयत संतोष पवार यांच्या शोधासाठी नातेवाईक मागील दोन,तीन दिवसापासून पोलीस ठाण्यात रात्रंदिवस चकरा मारत असताना पोलीस तपासात सर्व उघड झाले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बेनिवाल, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे ,पोलीस हवालदार अशोक हिंगे, सुरेश पुलाते, के. एस. तेलंगे, के. आर. मुलगीर, अमोल वाडेकर यांनी भेट दिली आहे.