परभणी/गंगाखेड (Parbhani Death) : पोलीस ठाण्याच्या (Parbhani Police) हद्दीतील मौजे खरबडा ता. पुर्णा शिवारात दि. १४ जून शुक्रवार रोजी सकाळी अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आला आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन (Parbhani Police) पोलीसांकडून करण्यात आले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे खरबडा तालुका पुर्णा शिवारात वझुर ते माळसोन्ना रस्त्यावर राजू भालेराव यांच्या शेताजवळील पुलाजवळ एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह (Parbhani Death) असल्याची माहिती बालाजी मुंजाजी ठेंबरे यांनी दि. १४ जुन शुक्रवार रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास खरबडा येथील पोलीस पाटील मायाताई अशोकराव शेळके यांना दिली.
कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन
मौजे खरबडा शिवारात वझुर ते माळसोन्ना रस्त्यावरील पुलाजवळ अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयाच्या एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती पोलीस पाटील मायाताई शेळके यांनी (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्याने उपविभागीय अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे, बिट जमादार दिपक व्हावळे, पो. शि. जगन्नाथ शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत. (Parbhani Death) अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाचा पंचनामा करून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेत. घटनास्थळावर सापडलेल्या मयताच्या चप्पल व कपड्यावरून अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे काम सुरू करून अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.