परभणी/पाथरी (Parbhani):- हादगाव बु ते डोंगरगाव रस्त्यावर लहान पुल आणि पोचमार्ग बांधकाम (construction) नसल्याने पावसाळ्यात येणारी समस्या बाजार समीती सभापती अनिलराव नखाते व रा.काँ.महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते यांनी २६ जुन रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे मांडली होती.त्यानंतर नखाते दांम्पत्याच्या पाठपुराव्याची उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी दखल घेतली.या कामास ३ आँक्टोबर रोजी प्रशासकीय मंजुरी व २ कोटी रुपयेचा निधी बाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
हादगाव बु ते डोंगरगाव रस्त्याचे कामासह पुलासाठी दोन कोटीचा निधी मंजूर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, पाथरी कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market) समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी मुंबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची २६ जुन रोजी भेट घेतली. यावेळी विवीध कामासह प्रामुख्याने हादगाव बु.येथील गावठाण नदीवरील नळकाडया पूल निजाम कालीन असून तो धोकादायक झालेला आहे. त्या पुलावर सतत नदीचे पाणी येत आहे व ते पाणी इंदिरानगर वसाहती मध्ये जात असल्यामुळे तेथील नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण होत आहे. यापूर्वी पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष पुर परिस्थितीची पाहणी करून तेथील नागरिकांना नवीन पुल बांधकामाचे आश्वासन दिले होते.मात्र यापुढे काहीच झाले नाही अशी कैफियत मांडली होती.त्यानंतर उपमुख्यमंत्री ना.पवार यांनी नविन पुलाचे पोचमार्गासह बांधकामासाठी अंदाजपत्रक सादर करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले होते.३ आँक्टोबर रोजी प्रजिमा २५ ते हादगांव बु ते डोंगरगाव रस्ता ,पुल मोरीसह कामास प्रशासकीय मंजूरी व दोन कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देणारा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
या मंजुरीतून होणाऱ्या कामामुळे या भागातील पावसाळ्यात उद्भवणारी समस्या आत्ता कायमची सुटणार आहे.याबद्दल नखाते दांम्पत्यासह हादगांव बु ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.