परभणी/मानवत (Parbhani) :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मानवत शहरातील मेनरोड वरील वालीबाचा मळा (राघवेंद्र इस्टेट) या मैदानावर तोफ धडाडणार असून पाथरी विधान सभा मतदान संघाचे (polling constituencies) महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प सभा
मानवत शहरातील मेनरोड वरील वालीबाचा मळा समोर या मैदानात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विजयी संकल्प सभेच्या पुर्व तयारीसाठी महायुतीच्या सर्व पदाधिकार्यांनी जोरदार तयारी केली असून या ठिकाणी होणार्या सभेच्या तयारीसाठी स्टेज, सभामंडप, आसन व्यवस्थेसह अनेक उपाययोजनाची पाहणी देखील महायुतीच्या पदाधिकार्यांनी केली आहे. बुधवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पाथरी विधान सभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राजेश उत्तमराव विटेकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विजयी संकल्प सभा होणार आहे. या सभेसाठी पाथरी विधान सभा मतदान संघातील महीला, नागरिक व तरुणांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पाथरी विधान सभा मतदान संघातील महायुतीच्या व राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.