परभणी/जिंतूर(Parbhani):- शहरातील जवाहर प्राथमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील ग्रंथालयातील पुस्तकांचे सलग दोन तास वाचन करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर मते सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक श्री. किशनरावजी वटाणे साहेब हे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली भाषणे
यामध्ये विवेक ठोंबरे, संस्कार कुलथे ,अनन्या भंडारे, आरोही सडाळ, आराध्या अंभोरे, कृतिका जाधव, वरद लिखे, स्वानंद तम्मेवार, श्रेया तळेकर, यशराज फंड, अमित खिल्लारे, अक्षत अवसरमोल, स्नेहा मेहेत्रे, पूर्वा पत्की, जानवी भालेराव, श्रावणी चोपडे, श्रद्धा भराडे ,वेदिका राठोड, आयान शेख यांचा समावेश होता. तसेच यावर्षीच्या नवनीत युवा मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी बक्षीस वितरण करण्यात आले. ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये अ गटातून कु.आरोही सडाळ व कृतिका जाधव तसेच ब गटामधून कु. कीर्ती ताटे तर क गटातून कू.संजीवनी जाधव या विद्यार्थ्यांना (Students) नवनीत युवा मास्टर स्ट्रोक तर्फे चित्रकला साहित्य किट बक्षीस देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच वाचनाची आवड जोपासली पाहिजे
शेवटी अध्यक्षीय समारोपात बोलताना मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर मते सर यांनी बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच वाचनाची आवड जोपासली पाहिजे व शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकाबरोबरच इतरही ग्रंथालयातील पुस्तके वाचली पाहिजेत असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. अलका परणे यांनी केले तर श्री.ज्ञानेश्वर पोटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शाळेतील सहशिक्षक श्री. शिवाजी ठोंबरे, रामकिशन टाके, अमोल राऊत, श्रीमती. कविता वैष्णव ,श्रीमती अनुजा कामारीकर,अस्मिता देवकर हे उपस्थित होत