सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यादीत पटकावला प्रथम क्रमांक
देशोन्नती वृत्तसंकलन
परभणी (Blood bank) : परभणी येथील जिल्हा रुग्णालयातील रक्तकेंद्र तर्फे मागील १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या वर्षात १४० रक्त शिबिरांतून तब्बल १०४८२ सर्वाधिक रक्त पिशवींचे संकलन करत राज्यातील ३४ जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत परभणीच्या रक्तपेढीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
वर्षभरात तब्बल १० हजार ४८२ रक्तपिशव्यांचे संकलन
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्य रक्तसंक्रमण परिषद, मुंबई यांच्या सन २०२४ च्या नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधून रक्तपिशवीचे संकलनात परभणी जिल्हा रुग्णालयातील (Blood bank) रक्तपेढीने सर्वाधिक तब्बल १०४८२ रक्त पीशव्यांचे संकलन करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सदरील १० हजार पेक्षा जास्त रक्तपिशवीचे संकलन परभणी येथील रक्तपेढी सुरुवात झाल्यापासून दुसऱ्यांदा करण्यात आले आहे.
हे श्रेय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार ,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे,अतिरिक्तजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सारिका बडे तथा वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रक्त केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विक्रमी रक्तपेशव्यांचे संकलन केले आहे .यासाठी परभणी जिल्ह्यातील रक्तदान शिबिर संयोजक तसेच ऐच्छिक रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले .तसेच परभणी जिल्ह्यातील रक्तदान शिबिर संयोजकांमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे जनतेमध्ये सुद्धा रक्तदानाचे महत्त्व व जनजागृती झाली आहे त्यामुळेच सन २०२४ मध्ये रक्त पिशवीचा कधीही तुटवडा जाणवला नाही.
तसेच गरजू रुग्णांना रक्तपिशवी (Blood bank) तसेच रक्तगट घटक देण्यात कोणतेही अडचणी निर्माण झाली नाही. परभणीतील नागरिकांनी यापुढेही असेच मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर घावेत तसेच स्वेच्छा रक्तदात्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर (Blood bank) रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याकरिता रक्त केंद्राचे शरीर विकृती शास्त्रज्ञ डॉ. मनीषा राठोड रक्तपेढीतील सर्व वैज्ञानिक कर्मचारी, वैद्यकीय समाजसेवक, अधीक्षक तांत्रिक पर्यवेक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.डॉ. नागेश लखमावार यांनी या अभिमानास्पद बाबीसाठी परभणी जिल्ह्यातील सर्व शिबिर संयोजक व ऐच्छिक रक्तदात्यांचे अभिनंदन केले आहे.
शिबिर संयोजक व रक्तदात्यांमुळेच शक्य
जिल्हा रुग्णालयातील (Blood bank) रक्तपेढीने ३४ राज्यात सर्वाधिक रक्तसंकलन करून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश लखमावार वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता,डॉ. सदानंद भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्त केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे .तसेच शिबिर संयोजक व रक्तदात्यांमुळेच हे शक्य झाले आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
– डॉ. सारिका बडे, अति. जिल्हा शल्यचिकित्सक परभणी.