सिजेरीयन झालेल्या महिलेची प्रकृती खालावल्याने मृत्यू, अकस्मातची नोंद
परभणी (Parbhani District Hospital) : मंगळवार २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी रुग्णालयात दाखल केलेल्या २६ वर्षीय महिलेला सिजेरीयनने मुलगी झाली. यानंतर प्रकृती खालावल्याने महिलेचा उपचारा दरम्यान बुधवार २५ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मृत्यू झाला. अवघ्या एक दिवसाच्या तान्हुलीचे मातृछत्र नियतीने हिरावून घेतले. महिलेच्या मृत्यू प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
संजय चंद्रकांत साळवे वय २८ वर्ष रा. कृष्णा नगर पाथरी रोड सेलू यांनी खबर दिली आहे. त्यांची पत्नी ज्योती साळवे गर्भवती असल्याने तिला सेलू येथे (Parbhani District Hospital) खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेचा रक्तदाब वाढल्याने तिला परभणी येथील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. जिंतूर रोडवरील एका (Parbhani District Hospital) रुग्णालयात महिलेचे सिजर झाले. महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीची प्रकृती सुखरुप आहे. बाळंतपणानंतर महिलेची प्रकृती अचानक खालावली. त्यातच उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोउपनि. अशोक जटाळ करत आहेत. मयत महिलेच्या पश्चात नवजात मुलगी, एक मुलगा, पती, सासु, आई, भाऊ असा परिवार आहे.
अपघातातील जखमीचा मृत्यू
परभणी : गंगाखेड शहरातील होळकर चौक या ठिकाणी झालेल्या अपघातात जखमी इसमाचा उपचारा दरम्यान २५ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास मृत्यू झाला. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जनार्धन गणपतराव शेप वय ४५ वर्ष, असे मयताचे नाव आहे. (Parbhani District Hospital) परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.