परभणी(Parbhani):- जिंतूर शहरात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी परवानगी दिलेली नसतांनाही कर्णकर्कश आवाजात डीजे (D.J) लावून गणेश मिरवणूक काढणाऱ्या पाच गणेश मंडळा पैकी चार गणेश मंडळाच्या अध्यक्षासह डीजे चालक, वाहन चालकांवर जिंतूर पोलिस स्थानकात (Police station)वेगवेगळया कलमानवे गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच डीजे वाहन जप्त करण्यात आले आहे.
पाच डीजे वाहन जप्त
या बाबत अधिक माहिती अशी की श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यात येऊ नये असे दोन वेळेस झालेल्या शांतात कमिटीच्या बैठकीचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. तरीही पोलिसांचा विरोध झुगारत शहरातील पाच गणेशमंडळांनी डीजे लावले होते. विसर्जन मिरवणुकीत नाचतांना डीजेच्या आवाजाने एकाचा मृत्यू (Death)तर तिघे अस्वस्थ झाले. डीजे लावणाऱ्या मध्ये शहरातील गणपती गल्ली मधील गजानन गणेश मंडळ, राजा शिवछत्रपती गणेश मंडळ, बामणी प्लॉट गणेश मंडळ, श्री नगरेश्वर गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा समावेश आहे. बंदी असतानाही डीजे आणत तो शहरात वाजवला म्हणून गणपती गल्ली मधील गजानन गणेश मंडळाचे अध्यक्ष ओंमकार मुकेश राठोड रा जिंतुर, डि.जे चालक नामे इस्माइल खान पाशा खान पठाण, रा गुलशन कॉलनी जिंतुर, एकनाथ शहाजी डोंबे रा बलसा ता. जिंतुर, पप्पु काळे रा जिंतुर यांनी वाहन क्रमांक एम एच 04 एफ जे 8941 मध्ये डीजे वाजवल्याबद्दल तर बामणी प्लॉट गणेश मंडळाचे अध्यक्ष रियाज खान शेर खान पठाण, रा. जिंतुर,डिजे चालक व मालक नामे सुनिल हरिभाऊ ऊबाळे रा.फुलंब्री, जि. संभाजीनगर, अमित किशन सोनवणे वय 24 वर्ष रा. छत्रपती संभाजी नगर यांनी वाहन क्रमांक एम एच 04 ई बी 9225 मध्ये विना परवाना डीजे वाजवल्याबद्दल तर नगरेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष मयुर प्रभाकर वट्टमवार रा जिंतुर डि.जे चालक नवनाथ गणपतराव कुडुक रा. बीड, आपरेटर व वाहन चालक यांनी वाहन क्रमांक एम एच 10 झेड 2437 मध्ये विना परवाना डीजे वाजवल्याबद्दल तर चौथा गुन्हा शहरातील आदर्श कॉलोनी मधील गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रदिप धर्माराव जाधव रा.जिंतुर, डि.जे चालक, डि.जे मालक व डि.जे ऑपरेटर यांच्यावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलिसात जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या कलम उल्लंघन करणे तसेच बी एन एस एस नुसार विविध कलमे गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच डीजे वाहन जप्त करण्यात आले आहे.