परभणी (Parbhani Earthquake) : बुधवार १० जुलै रोजी सकाळी ७.१४ मिनिटांना परभणी जिल्ह्यात (Parbhani Earthquake) भुकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवित व वित्त हानी झाली नाही. भुकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यात होते. मागील दोन महिन्यात दुसर्यांदा भुकंपाचा हादरा बसला आहे. बुधवारी सकाळी जिल्ह्यात भुकंपाचे धक्के जाणविले. सौम्य स्वरुपाचा भुकंप होता. भुकंपाचे केंद्र बिंदू (Hingoli district) हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ होते.
हिंगोली जिल्ह्यात भुकंपाचे केंद्र,
परभणीसह हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशिम जिल्ह्यासह मराठवाडा आणि विदर्भात देखील भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. या अगोदर मे महिन्यातही परभणी जिल्ह्याला भुकंपाचा (Parbhani Earthquake) धक्का जाणवला होता. जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, तालुक्यासह इतर ठिकाणीही भुकंपाचे धक्के जाणवले. जमीन हादरल्याने नागरीक भयभित झाले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जिवित वित्तहानी झाली नाही. नागरीकांनी घाबरून जावू नये, योग्य खबरदारी घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.