परभणी (Parbhani Election Results) : लोकसभा निवडणूकीसाठी (Loksabha Election) घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवार ४ जून रोजी वनामकृवि परिसरात होणार आहे. सुरक्षीततेच्या अनुषंगाने जिल्हा व पोलिस प्रशासनाने ओळखपत्र असल्याशिवाय विद्यापीठ परिसरात प्रवेश देण्यात येणार नाही. मॉर्निंग वॉकसाठी देखील सकाळी येणार्या नागरीकांनाही प्रवेश देण्यात येणार नाही, असू सूचना (Parbhani Police) जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी दिल्या आहेत.
बलसा, शेंद्रा, लोहगाव, सायळा गावच्या मार्गात बदल
परभणी लोकसभा (Parbhani Election Results) निवडणूकीची मतमोजणी वनामकृविच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ४ जून रोजी सकाळी ५ वाजेपासून सुरू होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत विद्यापीठ गेट (काळी कमान) येथून निवडणूक मतमोजणी प्रक्रियेचे पासधारक अथवा संबंधित ओळखपत्र धारक व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. शेंद्रा, सायळा, बलसा, माखणी, ईठलापूर आणि लोहगाव आदी गावांतील नागरीकांनी मंगळवार ४ जून रोजी संपुर्ण दिवभर परभणी शहरात येण्यासाठी व जाण्यासाठी नवोदय विद्यालय – साखला प्लॉट – अनुसया टॉकिज या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
पोलिस अधिक्षकांचे आवाहन
तसेच मतमोजणीसाठी (Election Results) येणार्या मत मोजणी प्रतिनिधी व निकाल ऐकण्यास येणार्या नागरीकांनी आपली वाहने वैजनाथ वस्तीगृहाच्या बाजुच्या मैदानात पार्विंâग करावी. मतमोजणी करीता येणारी अधिकारी, कर्मचारी, उमेदवार व पत्रकारांनी देवगिरी वस्तीगृहाशेजारील मोकळ्या जागेत आपली वाहने पार्किंग करावी. मतमोजणी कक्षात व परिसरात निवडणूक आयोगाने विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींशिवाय इतर कोणालाही मोबाईल व तत्सम ईलेक्ट्रॉनिक डिव्हाईस घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नागरीकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन (Parbhani Police) पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.