परभणी (Parbhani Electricity) : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून सूर्य जोरदार आग ओकत आहे. त्यात (Parbhani Electricity) परभणी महावितरणच्या गलथान कारभारामुळे दिवसभरात सरासरी तीन ते चार तास वीज पुरवठा खंडीत होत आहे. याकडे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. परभणी शहरासह संपूर्ण जिल्हाभरात महावितरणच्या मनमानी कारभाराचा सर्वसामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. कारण परभणी शहरात सरासरी दिवसभरात तीन ते चार तास (Power supply) विद्युत पुरवठा काही ना काही कारणाने बंद पडत आहे. त्यामुळे नागरीकांना घरामध्ये उकाडा सहन करावा लागत आहे. याची अधिकार्यांकडे चौकशी केल्यास कोणीही उत्तर देण्यास तयार नसतात.
अधिकारी-कर्मचारी फोन उचलत नाहीत
कधी-कधी महावितरणची यंत्रणा काम करत असली तरीही महत्वाच्या भागालाच प्राधान्य देण्यात येते. या विषयी जबाबदार अधिकारी सुध्दा बिनधास्तपणे ठरावीक भाग महत्वाचा असून सर्वसामान्य, गरीब, अल्पसंख्यांक व्यक्ती राहणार्या भाग महत्वाचा नसल्याचे फोनवर सांगतात. यात विशेष म्हणजे (Parbhani Electricity) शहरातील औद्योगिक परिसरात (Power supply) विद्युत पुरवठा करणारे एक्सप्रेस फीडर वारंवार बंद पडल्यामुळे उद्योजकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एमआयडीसी परिसरात उद्योगाला लागणारी वीज ही एक्सप्रेस फीडर मधून पुरवठीत केली जाते. मात्र औद्योगिक परिसरातील हे फीडर दिवसभरात तीन ते चार वेळेस बंद पडते.
परभणी एमआयडीसी फीडर वारंवार पडते बंद
त्यामुळे परिसरातील मोठ-मोठ्या यंत्रांना अचानक खंडीत झालेल्या (Power supply) विद्युत पुरवठ्यांना नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी महावितरणच्या अधिकारी, कर्मचार्यांना संपर्क केल्याचा प्रयत्न केल्यास कोणीही फोन उचलत नाहीत. तसेच जबाबदार कर्मचारी घटनास्थळी गैरहजर असतात. त्यामुळे उद्योगांना अधिच बारा अडचणी त्यात खंडीत (Parbhani Electricity) विजेच्या पुरवठयाची ही भरात भर म्हणावी लागेल.
शहरी भागासह ग्रामीण भागात सुध्दा महावितरण-च्या कारभाराचा ग्रामीण गावातील नागरीकांना, शेतकरी वर्गाला मोठा फटका बसत आहे.
दिवसभरात छोटंसं वादळ वारं झाला तर लगेच (Power supply) विद्युत पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे (Parbhani Electricity) विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत वाट पहावी लागते. या सर्व महावितरणच्या गलथान कारभाराचा जिल्हावाशीयांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे कोणतेही जबाबदार अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत.