परभणी शहर वाहतूक शाखेने केली कारवाई
परभणी (Parbhani Encroachment) : शहरातील जिंतूर रोडवरील हनुमान चौक, जांब नाका ते जेल कॉर्नर दरम्यान रस्त्यावर (Parbhani encroachment) अतिक्रमण करून बसविलेल्या फळ विक्रेत्यांचे गाडे परभणीकरांच्या मुळावर आल्याची बातमी दै. देशोन्नतीने प्रकाशित केली. याची दखल (Parbhani police) परभणी पोलीस शहर वाहतूक शाखेने घेऊन सदरील फळविक्रेत्यांचे रस्त्यावर आलेले अतिक्रमण हटविले. आणि रस्ता मोकळा करण्याची कारवाई रविवार १९ मे रोजी सकाळी १० वाजता केली.
दै. देशोन्नती दखल; पोलीस प्रशासनाची कारवाई
दरम्यान, परभणी महानगरपालिका (Parbhani Municipal) प्रशासनाने ही कारवाई पोलीसांची मदत घेऊन करणे अपेक्षित होते. पण मनपा प्रशासनाने याकडे स्पष्ट दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. शहरातील जिंतूर रोडवरील हनुमान चौक, जांब नाका ते जेल कॉर्नर दरम्यान फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करत आपली दुकाने मांडली होती. हे अतिक्रमण रस्त्यावर आल्याने फळे खरेदी करताना नागरीकांची वाहने रस्त्याच्या मधोमद उभी राहत होती. त्यामुळे (Parbhani police) वाहतूक पोलीस कर्मचारी वाहनधारकांना दंड लावत होते. परभणीकरांचा काहीही दोष नसताना दंड सहन करावा लागत असे. अतिक्रमण हटविण्यासंदर्भात बातमी दै. देशोन्नतीने प्रकाशित केली होती. याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली व अतिक्रमण धारकांची बैठक घेऊन अतिक्रमण काढण्याची सुचना केली.
रविवारी सकाळी (Parbhani police) पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी व अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या सुचनेनूसार (Parbhani police) वाहतूक पोलीसांनी हे अतिक्रमण सहा फुट काढून रस्ता मोकळा केला. अतिक्रमण धारकांनी ठराविक जागा सोडून रस्त्यावर आल्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले. तर यावेळी काही फळ गाडे जप्त करण्यात आली. ही कारवाई वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले, पोउपनि. दिपक, पोउपनि. मकसूद पठाण, कर्मचारी अनिल राठोड, शेख मुस्ताक, अनिल गायकवाड, बचाटे, देशमुख, जोशी, पवार, सानप व इतर उपस्थित होते.
महामार्गावरही अतिक्रमण; वेळीच लक्ष देण्याची गरज
परभणी शहरातील अनेक रस्त्यांवर आज (Parbhani encroachment) अतिक्रमण झाल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत जात आहे. शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण होत असताना महामार्गावरही मनपा हद्दीत अतिक्रमण वाढले आहे. वसमत रोड नंतर पाथरी रोडवर अतिक्रमण वाढत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास महामार्गही अतिक्रमणाच्या विळख्यात अडकणार आहेत.