पाथरी तालुक्यातील वडी येथील घटना
परभणी/पाथरी(Parbhani/Pathri) :- नात्यातील एक व्यक्ती पत्नीवर वाईट नजर टाकत होता. इतर दोघेजण त्याला प्रोत्साहन देत होते. या मानसिक त्रासाला (mental distress) कंटाळलेल्या २८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २८ एप्रिल रोजी दुपारी पावने चारच्या सुमारास पाथरी तालुक्यातील वडी येथे उघडकीस आली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिघांवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिघांवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडू बापुराव मायंदळे वय ६५ वर्ष यांनी तक्रार दिली आहे. विकास बंडू मायंदळे वय २८ वर्ष असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत आणि आरोपी हे आपसामध्ये नातेवाईक आहेत. आरोपी शिवा दिवटे हा मृताच्या पत्नीवर वाईट नजर टाकीत होते. त्याला राधा दिवटे, मदन दिवटे हे दोघेजण प्रोत्साहन देत होते. या प्रकाराचा विकास मायंदळे याला मानसिक त्रास होत होता. याच त्रासाला कंटाळून विकासने स्वत: च्या शेतात लिंबाच्या झाडला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide by hanging)केली. या प्रकरणी शिवा मदन दिवटे, राधा मदन दिवटे, मदन धोंडीराम दिवटे या तिघांवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि. मुळे करत आहेत.
तिघांवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
विकास बंडू मायंदळे या २८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात रविवार २८ एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण तीन आरोपींवर गुन्ह्याची नोंद झाली असून तपास सपोनि. मुळे करत आहेत.