गंगाखेडच्या वागदरी शिवरातील घटना
परभणी/गंगाखेड (Parbhani farmer died) : शेतात काम करत असतांना विजेचा धक्का लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना बुधवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील वागदरी शिवारात घडली. (Parbhani farmer died) याप्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील वागदरी येथील शेतकरी गोविंद रावसाहेब मुंडे वय ३६ वर्ष हे बुधवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास शेतात काम करत असतांना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडल्याने शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. जमादार सुंदरराव शहाणे, पो.शि. राम पडघन यांनी पंचनामा केला. (Parbhani farmer died) याप्रकरणी गंगाबाई गोविंद मुंडे यांनी दिलेल्या खबरी वरून पिंपळदरी पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली.