परभणी/ताडकळस (Parbhani farmer Suicide) : येथील पोलीस ठाणे हद्दितील मौजे मजलापुर येथील एका शेतकरी पुत्राने पीक कर्जाला कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (farmer Suicide) केल्याची घटना शनिवार मध्यरात्री एक ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी (Parbhani Police) ताडकळस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पीक कर्जाला कंटाळून घडली घटना
या बाबत योगेश काशिनाथ जाधव यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली की, मजलापुर येथील आत्माराम सोनाजी जाधव वय ४५ वर्ष हे अल्पभुधारक शेतकरी पुत्र होते. त्यांचे वडिल सोनाजी जाधव यांच्या नावाने पाच एकर शेती (farmer Suicide) असून पूर्णा येथील भारतीय स्टेट बँक व परभणी बडोदा बँकेचे पीक कर्ज वडिलांनी घेतले होते. जून महिना संपत आला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने पेरणी खोळंबली आहे.
ताडकळस पोलीस ठाण्यात नोंद
या मुळे बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून आत्माराम जाधव यांनी शनिवार २२ जून रोजी त्यांचे चुलते एकनाथ माणिक जाधव यांच्या शेतातील गट नंबर ०६ मधील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (farmer Suicide) केल्याची घटना घडली. ही घटना कळताच पोउपनि. गजानन काठेवाडे यांच्या सुचनेनुसार संतोष चाटे, भरत तावरे, भिंगे, वडजे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन ताडकळस प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव कांबळे यांनी केले. या प्रकरणी ताडकळस (Parbhani Police) पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई – वडिल असा परिवार आहे.