परभणी(Parbhani) :- जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी येथील नारायण किसन ढाकणे यांचे अतिवृष्टीमुळे (heavy rain) पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने निधन झाले होते. त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात आली. आ.मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.
आ.मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते धनादेश
आ.मेघना बोर्डीकर यांनी शासन दरबारी प्रयत्न करत सदर कुटूंबाला आर्थिक मदत मिळून दिली. ४ लक्ष रुपयांचा धनादेश सुमकटन किसन ढाकणे यांना देण्यात आला. यावेळी तहसीलदार, नायब तहसीलदार, संचालक रामराव दादा घुगे, राजाभाऊ घुगे, बाळासाहेब घुगे, अशोक बुधवंत, रवी रणबावळे, सिध्दु वाकळे, सचिन आढे, अजित भोंबे, तात्या करवलीकर, महादेव दराडे, शिवाजी काळे यांची उपस्थिती होती.