परभणी/जिंतूर (Parbhani Fire) : अचानक लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य (Parbhani Fire) जळून खाक झाले. ही घटना तालुक्यातील कोरवाडी येथील गट नंबर 236 मधील शेतात घडली. या घटनेमुळे कष्टकरी शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
शेतकऱ्यांचा संसार आला उघड्यावर
तालुक्यातील कोरवाडी येथील रामेश्वर हरसिंग राठोड (67) हे आपल्या पत्नी व मुलासह राहत असून रोजी सकाळी 11:30 वा. राठोड यांच्या घराला अचानक आग लागली. शेतात काम करत असताना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या पत्नी, सुन व मुलासह घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला. उन्हाची तीव्रता पाहता त्यांचे अफाट प्रयत्न कमी पडले. अन पाहता पाहता संपूर्ण घराची (Parbhani Fire) राख रांगोळी झाली.
नातवांचे शैक्षणिक साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक
आगीत सोयाबीन, नुकताच शेतातून काढलेला भुईमूग, कपडे, दोन स्प्रिंकलर सेट, नातवांचे शैक्षणिक साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे, अंगावरील घरात ठेवलेल सोन आणि लोखंडाच्या पेटीत ठेवलेली रोख रक्कम जळून खाक (Parbhani Fire) झाल्याने राठोड यांचे जवळपासप 3 लाखाचे नुकसान झाले असून राठोड कुटुंबियांचा संसार उघड्यावर आला आहे. (Fire) आगीची माहिती मिळताच गावातील सरपंच दिनकर आलाटे यांनी ही माहिती तहसील प्रशासनास फोन द्वारे कळवून सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सदरील घटनेचा पंचनामा तलाठी विकास आगलावे यांनी केला. मदतीची अपेक्षा असून तशी मागणीही आहे. राठोड कुटुंब यांना लागणारे संसार उपयोगी साहित्य मदत स्वरूपात पंचकोशातील नागरिकांनी आपल्या परिस्थितीनुसार मदतीचा हात द्यावा, असे आवाहन कोरवाडी येथिल दिनकर आलाटे यांनी केले.