गंगाखेड (Parbhani Fire) : दुपारच्या वेळी अचानक लागलेल्या आगीत कडब्याची गंजी व गोठा जळून खाक (Parbhani Fire) झाल्याची घटना तालुक्यांतील देवकतवाडी शिवारात घडली. यामध्ये हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गंगाखेडच्या देवकतवाडी येथील घटना
माहितीनुसार, गंगाखेड तालुक्यातील देवकतवाडी शिवारात गोविंद रेखाजी पवार यांच्या शेतात तुकाराम रुपला राठोड यांनी रचून ठेवलेल्या २२०० कडब्याच्या गंजीला दिनांक ९ मे गुरुवार रोजी दुपारी १ बाजेच्या सुमारास अचानक आग लागली. (Parbhani Fire) भर दुपारी रख रखत्या उन्हात कडब्याच्या गंजीने पेट घेतल्याची माहिती समजताच तुकाराम रुपला राठोड, वसंत बाबू राठोड, किरण सिताराम पवार, आत्माराम राठोड, सतीश पवार आदींनी शेतात धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र कडक उन्हात लागलेली आग आटोक्यात येण्याऐवजी वाढतच गेली.
या आगीने कडब्याच्या गंजीसह गोठा ही कवेत घेतल्याने गोठ्यात ठेवलेले खताचे पोते, कपडे व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र अंदाजे २२०० कडबा व गोठा पूर्णपणे जळून खाक (Parbhani Fire) झाल्यामुळे सुमारे ७० हजार रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे तुकाराम रूपाला राठोड यांनी सांगितले आहे.