परभणी (Parbhani fire): विद्युत तारेचा स्पर्श (Electric shock) झाल्याने ठिणग्या उडून आयशर मधील कडब्याने पेट घेतला. या आगीत कडब्यासह वाहन जळाले. ही घटना मंगळवार १४ मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास (Parbhani District) परभणी तालुक्यातील मांगणगाव येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
परभणी तालुक्यातील मांगणगाव येथील घटना
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, मांगणगाव येथून (Parbhani Crime) परभणीकडे एक आयशर वाहन कडबा घेवून येत होते. रस्त्यावरुन गेलेल्या (Electric shock) विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन ठिणग्या उडाल्या. धावत्या टेम्पोने आग पकडली. आगीत कडबा जळाला. गाडी मालक सय्यद मुक्कदर यांनी घटनेची माहिती (Parbhani Fire Brigade) परभणी अग्निशमन दलाला दिली.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
माहिती मिळताच (Fire Brigade) अग्निशमनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सय्यद नजीम, निखिल बेंडसुरे, संतोष मुदीराज यांनी आग विझविली. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. कडबा आणि वाहन जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.