परभणी (Parbhani):- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परभणी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ३ लाख ४८ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परभणीच्या राज्य उत्पादन शुल्कची विशेष मोहिम
सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चार पथके तयार करुन अवैध दारु (Illegal liquor), हातभट्टी दारुवर कारवाई करण्यात आली. २१ गुन्हे उघडकीस आणण्यात आले. या कारवाईत २० आरोपींजवळून ३ लाख १५० लिटर गुळ मिश्रीत रसायन, १२२ लिटर हातभट्टी दारु, ५८ लिटर देशी दारु, तीन दुचाकी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई निरीक्षक सु.अ. चव्हाण, ए.एम. पठाण, एम.एस. पतंगे, एन.एन. निलमवार, एच.एम. पाकलवार, व्ही.व्ही. फुलारी, ए.बी. केंद्रे, ए.बी. जाधव, बी.एल. ओव्हाळ, राहुल बोईनवाड, ऋषीकेश साळवे, विजय टेकाळे, भिमेश्वर पुपोलवार, बालाजी कच्छवे, राहुल शेळके, राम सुर्यवंशी, करण सातपुते, सुनिल चव्हाण, रवि सावंत, संदिप डहाळे, तुषार राठोड, ऐश्वर्या चौधरी, वैष्णवी सोळंके यांनी कारवाई केली. पुढे देखील याच पध्दतीने कारवाया सुरु राहतील अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक यांनी माहिती दिली आहे.
सलग चार दिवस राहणार परभणीत ड्रायडे
सीसीटिव्ही कॅमेर्याची (CCTV Camera)नजर सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील दोन मद्यार्क निर्मिती घटक, सात ठोक विक्री देशी दारु अनुज्ञप्तीवर सीसीटिव्ही कॅमेरामार्फत नजर ठेवली जात आहे. तसेच किरकोळ विक्री अनुज्ञप्तीच्या दैनंदिन मद्य विक्रीवर अधिकारी लक्ष ठेऊन आहेत. जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून मतदान दिनांक २० नोव्हेंबर रोजी पूर्ण दिवस मतदान प्रक्रिया संपेपर्यंत बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी २३ नोव्हेंबरलाही ड्रायडे घोषीत करण्यात आला आहे.