Parbhani :- परभणीच्या सेलू म्हशीच्या गोठ्यात कपाटामध्ये ठेवलेले चार लाख ५५ हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. हि घटना २१ मे रोजी सकाळी सेलू येथील शाहुनगरात उघडकीस आली. या प्रकरणी २२ मे ला सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला आहे.
लग्णासाठी बाहेर गावी केल्या नंतर चोरी अज्ञातावर गुन्हा दाखल
गोकुळ डोळझापे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीचा शाहु नगर येथे म्हशीचा गोठा आहे. या गोठ्यातील आलमारीत त्यांनी दुधाचे आलेले पैसे, म्हशीच (buffalo)व्यवहाराची रक्कम ठेवली होती. १९ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास फिर्यादी लग्नकार्यासाठी नाशिक येथे गेले. लग्न झाल्यानंतर २० मे ला रात्री परत आले. २१ मे रोजी सकाळी म्हशीच्या गोठ्यात असलेले कपाट उघडून पाहिले असता त्यांना कपाट ठेवलेले ४ लाख ५५ हजार रुपये दिसून आले नाही. अज्ञात चोरट्याने सदर रक्कम लंपास केली. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह. शेख करत आहेत.