परभणी (Parbhani):- कानामध्ये हेडफोन (Headphones)लावून रेल्वे पटरीवर मोबाईलमध्ये पब्जी गेम खेळत बसलेल्या एका ३४ वर्षीय युवकाचा मुंबईकडे जाणार्या देवगिरी एक्सप्रेसच्या धडकेत गंभीर जखमी(seriously injured) होऊन मृत्यू झाला.
मुंबईकडे जाणार्या देवगिरी एक्सप्रेसने दिली धडक
ही घटना १३ जुलै रोजी रात्री साडे आठच्या सुमारास पारवा रेल्वे गेट परिसरात घडली. या प्रकरणी सोमवार १५ जुलै रोजी सायंकाळी उशीरा कोतवाली पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सय्यद हामेद वय ३४ वर्ष, असे मृतक युवकाचे नाव आहे. या बाबत मृतकाचे वडिल सय्यद मीर यांनी खबर दिली आहे. १३ जुलै रोजी रात्री साडे आठच्या सुमारास सय्यद हामेद हा कानामध्ये हेडफोन लावून मोबाईलवर पब्जी गेम (pubg game)खेळत रेल्वे पटरीजवळ बसला होता. यावेळी परभणीहून मुंबईकडे जाणार्या देवगिरी एक्सप्रेसची त्याला जोराची धडक बसली. डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव(Bleeding) झाल्याने हामेदचा जागीच मृत्यू झाला. कोतवाली पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार विशाल गायकवाड करत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना शहरातील यशवंत नगर भागात घडली होती. मोबाईलवर बोलत असताना घराच्या छतावरुन पडून एका तरुणीचा मृत्यू झाला होता.