परभणी जिल्ह्यातील एकुण नऊ गुन्ह्याची उकल; १२ लाख ४४ हजार रु. मुद्देमाल जप्त
परभणी (Parbhani Gang stealing) : शेतकर्यांचे सोयाबीन चोरणारी टोळी जेरबंद करण्यात परभणी पोलिसांना यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्ह्यात शेतकर्यांचे चोरीस गेलेले १५० कट्टे सोयाबीन, हळदीचे ८ कट्टे व नगदी १ लाख ७१ हजाराची रोकड आणि चोरीसाठी वापरलेले वाहन असा एकूण १२ लाख ४४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह (Parbhani Gang stealing) टोळीस ताब्यात घेण्यात आले.
परभणी जिल्ह्यातील शेतकर्यांचे सोयाबीन, हळद इत्यादी चोरी गेल्याचे काही गुन्हे दाखल होते. या (Parbhani Gang stealing) गोष्टींची गांर्भीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी स्था.गु.शा.चे पो.नि.पाटील यांना मार्गदर्शनपर सुचना देवून या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यास आदेशित केले होते. त्यावरून स्थागुशा.चे वेगवेगळे पथक रवाना करण्यात आले. २० मार्च रोजी पथकास गोपनिय माहिती मिळाली.
या (Parbhani Gang stealing) गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर शंकर पवार (वय २६ वर्षे, रा. राजीव गांधी नगर, सेलू) हा सेलू येथे आठवडी बाजारात आहे. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्याने त्याच्या ११ साथीदारांची नावे सांगितली. त्यावरून आरोपी सागर सुंदर काळे, कृष्णा सुंदर काळे व मिथून बापूराव काळे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी अनेक गुन्हे केल्याची माहिती दिली. तसेच त्याने इतर ८ आरोपींची नावे सांगितली. सेलू-४, बोरी-२, जिंतूर, चारठाणा व परभणी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ९ गुन्हे उघड झाले. गुन्ह्यातील मुद्देमाल १५० कट्टे सोयाबीन, हळदीचे ८ कट्टे, १ लाख ७१ हजार रुपये नगदी व गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा पिक अप वाहन असा एकूण १२ लाख ४४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ४ आरोपींना पुढील तपाससाठी सेलू पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
आरोपींना पोलिस कोठडी
ही (Parbhani Gang stealing) कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांंच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थागुशाचे पोनि. विवेकानंद पाटील, सपोनि. राजीव मुत्येपोड, पोअं.हनमंत जक्केवाड, मधूकर चट्टे, निलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, रणजीत आगळे, जमीर फारोखी, विष्णू चव्हाण, किशोर चव्हाण, संजय घुगे, हनवते, मधूकर ढवळे, सायबर ब्रँचचे गणेश कौटकर यांनी यशस्वी केली. आरोपींना सेलू पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर सपोनि. भाग्यश्री पुरी यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.