दुर्गंधी, धुळीमुळे नागरीक झाले त्रस्त
परभणी (Parbhani) :- सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या हजरत तुराबुल हक रहे यांच्या ऊरुस यात्रेस प्रारंभ झाला आहे. देशभरातील भाविक, व्यापारी ऊरुसात दाखल होत असल्याने यात्रेत प्रचंड गर्दी होत आहे. मात्र यात्रे स्वच्छतेचे कोणतेही नियोजन नसल्याने जागोजागी कचर्यांचा ढीग साचला आहे. त्यामुळे भाविकांना धुळ आणि कचरा दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
कचरा उचलण्याची जबाबदारी कुणावर…?
परभणीत होणार्या यात्रेत दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने प्रचंड गर्दी असते. या वर्षी सुध्दा भाविकांनी गर्दी केली आहे. विविध वस्तु, साहित्य विक्रीची दुकाने थाटली आहेत. हॉटेल्स, फेरीवाले, फळविक्रेते यांनी व्यवसाय सुरु केले आहेत. मात्र या यात्रेत होणार्या कचर्याची विल्हेवाट लावण्याचे कोणतेही नियोजन दिसून येत नाही. जागोजागी कचर्याचे (Garbage) ढीग साचले आहे. आधीच उर्सात प्रचंड धुळ आहे. त्यामुळे नागरीकांना तोंडाला रुमाल बांधून फिरावे लागत आहे. शिवाय कचर्याच्या दुर्गंधीचा देखील सामना करावा लागत आहे.