परभणी (Parbhani) :- स्वत:च्या पत्नीस नांदवण्यास नकार देवून तीन तलाक (divorce) देण्यात आला. सदर प्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन पती विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरीन फातेमा शेख या विवाहितेने तक्रार (Complaint) दिली आहे. पती रियाजोद्दिन शेख याने पत्नीला नांदवण्यास नकार देवून तु माझी पत्नी नाहीस, असे म्हणत तीन वेळेस तलाक म्हणून तलाक दिला. ही घटना २९ जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास रेल्वे स्टेशन (Railway station) भागात घडली. सदर प्रकरणी ३० जानेवारीला नवा मोंढा पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह. उगले करत आहेत.