परभणी/पाथरी (Parbhani):- तुझ्या भावाकडे निपाणी कारखान्याचे माझे ४ लाख रुपये उचल बाकी आहे. ती आणुन द्या व भावाला घेऊन जा असे म्हणत एकाला बळजबरीने पळवुन नेण्यात आले. त्याला सोडण्यासाठी रक्कमेची मागणी करण्यात आली. ही घटना १२ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या दरम्यान पाथरी शहरात घडली. या प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात (Police station)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादीला फोन करुन केली ४ लाख रुपयांची मागणी
संजय बळीराम तोडके यांनी तक्रार दिली आहे. आरोपी बीबीशन चौरे व इतर तीन अनोळखींनी फिर्यादीचा भाऊ शिवाजी तोडके याला बळजबरीने पळवुन नेले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला फोन करुन ४ लाख रुपयांची मागणी केली. रक्कम दे आणि भावाला घेऊन जा असे सांगितले. पोलिसात तक्रार दिली तर भावाला कर्नाटक येथे नेऊन सोडून देईल अशी धमकी दिली. या प्रकरणी पाथरी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सपोनि. कापुरे करत आहेत.